Latest News in Pune Today : भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Pune Maharashtra News LIVE Today : पुण्याचे अपडेट्स एका क्लिकवर

13:20 (IST) 28 Feb 2025

राज्य सरकारचे पुण्यातील ‘प्रेम’ आटले! सहा महिन्यानंतरही निधी मिळेना..

सहा वर्षांपूर्वी २०१९ मध्ये शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. यामध्ये अनेक सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या होत्या.

सविस्तर वाचा…

13:12 (IST) 28 Feb 2025
स्वारगेट बलात्कार प्रकरण : आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार, काँग्रेसचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू

स्वारगेट बस स्थानकात बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून अटक करण्यात आली. आरोपीला लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून काही वेळात आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र लष्कर पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू झाले असून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि गृहमंत्री, पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

12:55 (IST) 28 Feb 2025

पुणे महापालिकेत केबल डक्टचा कोट्यवधींचा घोटाळा ? आयुक्तांकडे तक्रार, खुलासा न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

केबल डक्टमध्ये महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असून महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून आठ दिवसांत खुलासा न केल्यास पोलिसांध्ये तक्रार करून न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

12:46 (IST) 28 Feb 2025

मराठी शाळा बंद पडताना अभिजाततेच्या दर्जाचा आनंद; ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्याकडून विरोधाभास अधोरेखित

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी मराठी शाळा बंद पडत असताना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करणे हा विरोधाभास असल्याचे अधोरेखित केले.

सविस्तर वाचा…

12:46 (IST) 28 Feb 2025

राज्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सुसंधी… येत्या शैक्षणिक वर्षात साकारणार डिजिटल लायब्ररी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि वाचनाची आवड वृध्दिंगत होणे आवश्यक आहे.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 28 Feb 2025

Pune Rape Case Updates Today : शेवटची टिप देणाऱ्याला मिळणार एक लाख रुपये, स्थानिकांचा करणार सत्कार; पुणे पोलीस आयुक्तांनी नेमकं काय सांगितलं?

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका पडीक शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त झाल्या.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 28 Feb 2025

“आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ, आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शंका”, पुणे पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!

आरोपीची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 28 Feb 2025

भारतीय शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी… ‘सूट’ उपकरणाद्वारे सौर ज्वाळांचा वेध

सूट उपकरणाने २२ फेब्रुवारी २०२४ रोजी एक्स ६.३ श्रेणीतील सौर ज्वाळांचे निरीक्षण केले. या सौर ज्वाळा अत्यंत तीव्र उद्रेकांपैकी एक आहेत.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 28 Feb 2025

पुण्यात घरांची सरासरी किंमत ७३ लाखांवर! ग्राहकांची पसंती कोणत्या भागाला अन् घरांना जाणून घ्या…

क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा गेल्या वर्षीचा आढावा घेणारा अहवाल गुरुवारी जाहीर केला.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 28 Feb 2025

पोलीस-नागरिकांत संपर्कदरी! खबऱ्यांचे जाळेही क्षीण झाल्याने तपासास विलंब होत असल्याचे माजी पोलीस अधिकाऱ्यांचे निरीक्षण

गेल्या काही काळात शहरात विविध प्रकारचे गुन्हे घडत असून, अत्याधुनिक संपर्क साधने हाताशी असूनही अनेकदा आरोपी लवकर सापडत नाही.

सविस्तर वाचा…

10:41 (IST) 28 Feb 2025
पिंपरीत उड्डाणपुलाखाली ‘पे ॲण्ड पार्क’; वाचा किती आहे शुल्क?

सशुल्क वाहनतळ धाेरण राबविण्यात अपयश आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता पुन्हा शहरातील उड्डाणपुलाखाली स्मार्ट सिटीअंतर्गत सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक फाटा, चिंचवड आणि निगडी या तीन ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली सशुल्क वाहनतळ सुरू केले जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्याचे महापालिकेचे नियाेजन आहे.

सविस्तर वाचा…

10:12 (IST) 28 Feb 2025

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठालाही राजकीय कडवेपणा, डॉ. विनया खडपेकर यांचे मत

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (दि. २७) साहित्य परिषदेतर्फे माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘विशेष साहित्य पुरस्कारांचे वितरण’ डॉ. खडपेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

सविस्तर वाचा…

09:53 (IST) 28 Feb 2025

भाषे विषयची गोडी निर्माण व्हायला हवी, विद्यानिधी वनारसे यांचे मत

भाषेविषयीची गोडी निर्माण व्हायला हवी, तेव्हाच खरे प्रश्न सुटतील, असे मत ज्येष्ठ नाट्य समीक्षक विद्यानिधी वनारसे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

सविस्तर वाचा…

09:44 (IST) 28 Feb 2025

पिंपरी : वल्लभनगर स्थानकावर मद्यपींचा वावर, सुरक्षेचा अभाव; केवळ सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आगाराची भिस्त

शहरातील वल्लभनगर स्थानकातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला ३२७, मुंबईला १८३ एसटी बस ये-जा करतात.

सविस्तर वाचा…

09:29 (IST) 28 Feb 2025

पुणे : नादुरुस्त बसबाबतच्या निवेदनाकडे दुर्लक्ष? एसटी कामगार संघटनेचा आरोप

एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात ५० हून अधिक नादुरुस्त बस उभ्या असल्याने, तेथील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सविस्तर वाचा…

09:16 (IST) 28 Feb 2025

पुणे : महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरण, उड्डाणपुल उभारणीला प्राधान्य; पर्यटनस्थळी पोलीस ठाण्यांची स्थापना

मावळ तालुक्यातील रस्ते, पाणी योजना, आरोग्यकेंद्र, कार्ला येथील श्री एकवीरा मंदिर परिसरातील विविध कामे, मावळमधील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली.

सविस्तर वाचा…

09:09 (IST) 28 Feb 2025

Pune Rape Case Dattatraya Gade: स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अटकेचा थरार; मध्यरात्री गुणाट गावात झाली अटक!

Dattatray Gade Arrest: पुणे शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री त्याच्या गावातून अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा…

09:07 (IST) 28 Feb 2025

रस्ते तीस दिवसांत अतिक्रमणमुक्त? कारवाईचे वेळापत्रक निश्चित, ‘पीएमआरडीए’चा महत्त्वपूर्ण निर्णय

शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला असून, ३० दिवसांत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे.

सविस्तर वाचा…

 

स्वारगेट पुणे बलात्कार प्रकरणाचे लाईव्ह अपडेट्स