पुणे : पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाकडून यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाचे काम आगामी तीन महिन्यांत सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, मेट्रोचा स्वारगेट ते कात्रज हा मार्ग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गावर सेवा सुरू आहे. या मार्गांचा विस्तार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट आणि रुबी हॉल ते रामवाडी असा होणार आहे.

रुबी हॉल ते रामवाडी या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते महिनाभरात पूर्ण होणार आहे. याचवेळी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्याचे कामही अंतिम टप्प्यात असून, ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या दोन्ही विस्तारित मार्गांवरील काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोची चाचणी होऊन त्यानंतर सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत या दोन्ही मार्गांवरील विस्तारित सेवा सुरू झालेली असेल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद

हेही वाचा : ससूनमध्ये पुन्हा तोच खेळ! महिनाभरात तिसऱ्या अधीक्षकाची नियुक्ती

पहिल्या टप्प्यातील मार्गांचा पुढे विस्तार करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या मार्गाच्या प्रस्तावाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मंजुरी दिली आहे. लवकरच मंडळाकडून याची शिफारस केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाला केली जाणार आहे. मंत्रालयाने शिक्कामोर्तब सुरू केल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. आगामी तीन महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होऊ शकेल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा : राज्यातील शाळांमध्ये परसबाग निर्मितीला प्रोत्साहनासाठी स्पर्धा; गेल्यावर्षीच्या स्पर्धेतून सुमारे २२ हजार ९७३ परसबागांची निर्मिती

कात्रजपर्यंत विलंब का लागणार?

पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी हा उन्नत मेट्रो मार्ग असणार आहे. त्याचा खर्च ९१० कोटी रुपये आहे. त्यामुळे त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची मंजुरीची आवश्यकता नाही. याचवेळी स्वारगेट ते कात्रज हा भुयारी मेट्रो मार्ग असणार आहे. त्याचा खर्च ३ हजार ६६३ कोटी रुपये आहे. हा भुयारी मार्ग अधिक खर्चिक आहे. त्याच्या मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाची परवानगी आवश्यक असल्याने त्याला विलंब लागणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पिंपरी : गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या गणेश मंडळांना सूचना

मेट्रोचे प्रस्तावित विस्तारित मार्ग

१) पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी

  • एकूण लांबी : ४.४ किलोमीटर
  • स्थानके : चिंचवड, आकुर्डी, निगडी

२) स्वारगेट ते कात्रज

  • एकूण लांबी : ५.४ किलोमीटर
  • स्थानके : मार्केट यार्ड, पद्मावती, कात्रज

‘पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या मेट्रोच्या विस्तारित मार्गाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक गुंतवणूक मंडळ याबाबत मंत्रालयाकडे शिफारस करेल. तसेच, स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तो प्राथमिक टप्प्यावर आहे’, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.