लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : नदीपात्रात डासांसारख्या कीटकांचे थवे आढळून येत असल्याने आता ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. या औषध फवारणीमुळे कीटकांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

केशवनगर आणि खराडी गावठाण भागात नदीपात्रात कीटकांचे थवे दिसून आले होते. त्याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमातून वेगाने प्रसारित झाली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा-पुण्यातील समान पाणीपुरवठा योजनेला पुन्हा मुदतवाढ… ‘हे’ आहे कारण

नदीपात्रातील वाढत्या जलपर्णीमुळे शहरात कीटकांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत विविध भागात औषध फवारणी करण्यात येणार आहे. तसे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्यानुसार हवेतील कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नदीकाठ लगतच्या परिसरात औषध फवारणी केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swarms of insects like mosquitoes in the riverbed the municipality will spray medicine through drones pune print news apk 13 mrj