गेले अडीच महिने सुप्तावस्थेत असलेल्या स्वाईन फ्लूने शहरात गेल्या दहा दिवसांत दोन बळी घेतले आहेत. इंदापूरचा एक रुग्ण स्वाईन फ्लूमुळे पुण्यात बुधवारी (७ जानेवारी) मृत्युमुखी पडला, तर आणखी एका महिलेचा ९ जानेवारीला स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला असून ती पुण्याचीच रहिवासी होती. सध्या स्वाईन फ्लूच्या आणखी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे.  
इंदापूर तालुक्यातील ३५ वर्षांच्या तरुणाचा बुधवारी रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. ३ जानेवारीला या रुग्णाला स्वाईन फ्लू असल्याचे निदान राष्ट्रीय विषाणू संस्थेमार्फत करण्यात आले होते. ‘एच १ एन १’ विषाणूच्या संसर्गासह न्यूमोनिया व शरीरातील विविध अवयव निकामी झाल्यामुळे (मल्टी ऑर्गन फेल्युअर) या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. उपचारांना सुरुवात करण्यास या रुग्णाकडून दोन दिवसांचा विलंब झाला होता. २०१५ सालचा हा स्वाईन फ्लूचा पहिला बळी होता. त्यानंतर शुक्रवारी वानवडीत राहणाऱ्या एका ५० वर्षांच्या महिलेचा स्वाईन फ्लूमुळे खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ९ तारखेलाच या महिलेला स्वाईन फ्लू झाल्याचे निदान राष्ट्रीय विषाणू संस्थेमार्फत करण्यात आले होते. ‘एच १ एन १’ संसर्गासह या महिलेलाही न्यूमोनिया आणि गंभीर जंतूसंसर्ग (सेप्टिसिमिया) झाल्याचे पालिकेच्या अहवालात म्हटले आहे. सध्या स्वाईन फ्लूच्या आणखी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
गेले अडीच महिने स्वाईन फ्लूमुळे पुण्यात एकही मृत्यू झाला नव्हता. १५ ऑक्टोबर २०१४ ला आंबेगाव तालुक्यातील तरुणाचा स्वाईन फ्लूमुळे झालेला मृत्यू हा पुण्यातील गतवर्षीचा स्वाईन फ्लूचा शेवटचा बळी ठरला. २०१४ मध्ये स्वाईन फ्लूचे ११ रुग्ण शहरात मृत्युमुखी पडले. यातील एक रुग्ण पुण्यातला रहिवासी होता, तर १० जण पुण्याबाहेरून उपचारांसाठी आलेले होते.
स्वाईन फ्लूची लक्षणे :
– सातत्याने तीव्र ताप येतो
– घसा दुखतो
– सर्दी  

Story img Loader