पिंपरी : महापालिकेच्या भोसरी-इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वरमहाराज क्रीडा संकुलातील कृत्रिम धावमार्गाचे (सिंथेटिक ट्रॅक) काम पूर्ण झाले आहे. वर्षभरानंतर खेळाडूंसाठी शुक्रवारी कृत्रिम धावमार्ग खुला करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरातील ॲथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी इंद्रायणीनगरमधील एकमेव मैदान आहे. या ठिकाणी चारशे मीटरचा आठ लेनचा कृत्रिम धावमार्ग आहे. अनेक वर्षांपासून धावमार्गावर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धांमुळे, तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना धावमार्ग खराब झाला होता. वर्षभरापूर्वी जुना धावमार्ग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

हेही वाचा…पुणे : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकारासोबत प्लॅन करून केली हत्या; १ कोटींचा काढला होता विमा

क्रीडा संकुलातील धावमार्गावर सकाळी आणि सायंकाळी या दोन सत्रांत खेळाडू मैदानी स्पर्धेचा सराव करत होते. खेळाडूंना सरावासाठी धावमार्ग उपलब्ध नसल्याने त्यांना इतर ठिकाणी सराव करावा लागत होता. धावमार्गावर सराव करता न आल्याने त्याचा थेट परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत होता. अखेरीस वर्षभराने धावमार्ग खुला केल्याने खेळाडूंनी समाधान व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Synthetic track at pimpri chinchwad municipality s sant dnyaneshwar maharaj sports complex near bhosari completed opens for athletes pune print news ggy 03 psg