राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या (एनजीटी) कार्यालयातून चोरट्यांनी खुर्च्या, टेबल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत ‘एनजीटी’चे कार्यालयीन अधिकारी विजय सिंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विधान भवन परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीत ‘एनजीटी’चे कार्यालय आहे. कार्यालयातील भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक टेबल आणि चार खुर्च्या लांबविल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेबल, खुर्च्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.‘एनजीटी’च्या कार्यालयात चोरी करणारा माहितगार असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.