समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. आणि या कंपनीचे संचालक महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध पुणे शहरात दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती तत्काळ कळविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्याबरोबर मोतेवार किंवा समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार आल्यास त्वरित कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.
समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. आणि या कंपनीचे संचालक महेश मोतेवार यांच्या विरुद्ध बनावट गुंतवणूक व गुंतवणूकदारांची साखळी संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक हे चौकशी करीत आहेत. त्यामुळे सीआयडीकडून मोतेवार व समृद्ध जीवन फूड्स संदर्भात शहरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची सविस्तर माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात तत्काळ पाठविण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. पोलीस ठाण्याकडे कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसेल तर निरंक म्हणून अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या बरोबरच समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि. आणि मोतेवार यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारी आल्यास त्यावर त्वरित कायदेशीर करावाई करावी, असे आदेश पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा