चिन्मय पाटणकर

पुणे : शाळेजवळील पानटपरी हटवण्यासाठी महापालिकेला पत्र दिल्याच्या रागातून नगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थाजवळ शंभर मीटरच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युवक क्रांती दलाने शिक्षण आयुक्तांकडे केली.

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

आणखी वाचा-पुण्यातील ३४ समाविष्ट गावांतील सांडपाणी वाहिन्यांचे काम निकृष्ट? आता होणार पोलखोल

शाळांजवळील पानटपऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन राज्य कार्यवाह जांबुवंत मनोहर, युक्रांद पुणे शहरचे अध्यक्ष सचिन पांडुळे यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना दिले. मराठवाडा संघटक श्याम तोडकर, अजय नेमाने उपस्थित होते. शिक्षण संस्थांजवळ शंभर मीटर परिसरात तंबाखुजन्य आणि अन्य पदार्थांची विक्री करता येत नाही, असा कायदा असूनही राज्यात अनेक शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थ, तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. यातूनच हेरंब कुलकर्णी यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षण संस्थाच्या आवारातील बेकायदा टपऱ्या आणि तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याबाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.