पिंपरी : मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणा-या टँकरचा निगडीतील भुयारी मार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात झाला. कठड्याला धडक बसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.
पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथे पादचारी भुयारी मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या कामामुळे सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावरून टँकर पुण्याच्या दिशेने जात होता. भुयारी मार्गाच्या कठड्याला टेम्पो धडकला. त्यामुळे अपघात झाला. अपघातानंतर चालक पसार झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, महिन्याभरापूर्वी चालकाचा ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅसवाहू टँकर पलटी झाला होता. मोठी गॅस गळती झाली होती. या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत.