पुणे : खराडीतील न्याती ईलसिया सोसायटीत टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकर व्यावसायिकाने दूषित पाण्याचा पुरवठा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. टँकर व्यावसायिकाने महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (एसटीपी) पाणी सोसायटीला दिल्यानंतर रहिवाशांना उलट्या, जुलाबाचा त्रास झाला. सोसायटीतील नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार दिल्यानंतर ही बाब उघड झाली. याप्रकरणी टँकरने सोसायटीला पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी श्रीराम वॉटर सप्लायर्सचे मालक श्रीनिवास रामलू दासरी (वय ४०) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेच्या बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता नितीन जाधव यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.

dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
pcmc health department to take punitive action if found garbage thrown in openly
कचरामुक्त पिंपरी-चिंचवडसाठी पुढाकार; आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांवर लक्ष
pistol 28 cartridges seized from passenger at pune airport
पुणे विमानतळावर प्रवाशाकडून २८ काडतुसे जप्त
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Arjun Khotkar On Kailas Gorantyal
Arjun Khotkar : “कैलास गोरंट्याल यांची दुकानदारी मी बंद करणार”, अर्जुन खोतकर यांचा थेट इशारा

हेही वाचा >>> दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना

खराडीतील न्याती ईलसिया सोसायटीत ८५० सदनिका आहेत. या सोसायटीला महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, रहिवाशांची संख्या विचारात घेता पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने सोसायटीने श्रीराम वॉटर सप्लायर्सला टँकरव्दाारे पाणी पुरवठ्याचे काम दिले होते. त्यानुसार सोसायटीला दररोज ३० ते ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, श्रीराम वॉटर सप्लायर्सकडून सोसायटीला महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात आला. हे पाणी बांधकामसाठी वापरले जाते. मात्र, श्रीराम वॉटर सप्लायर्सने दूषित पाणी पुरवठा केल्याने सोसायटीतील रहिवाशांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असे त्रास सुरू झाल्याने त्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील मुख्य अभियंता नंदकुमार जगताप यांच्याकडे २३ डिसेंबर रोजी तक्रार दिली. त्यानंतर पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता नितीन जाधव, उपअभियंता अन्वर मुल्ला यांनी सोसायटीला भेट दिली. सोसायटीला टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> पुणे :दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाचा खून; लोणी काळभोरमधील घटना

श्रीराम वॉटर सप्लायर्सने ७ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर या कालावधीत न्याती ईलेसिया सोसायटीत टँकरद्वारे प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरवले. या पाण्याचा वापर रहिवाशांनी पिण्यासाठी केल्याने आरोग्यविषयक त्रास झाला. चैाकशीत ही बाब उघड झाल्यानंतर पाणी पुरवठा करणारा पाणी पुरवठा करणारा टँकर व्यावसायिक श्रीनिवास दासरीला अटक करण्यात आली. भारतीय न्यायसंहितेनुसार नागरिकांच्या आराेग्यास धोका पोहोचविणे, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. – संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे</p>

Story img Loader