पिंपरी : शहरातील पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागात टँकर लॉबीसाठी महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यास भाग पाडले जात असल्याचा तक्रारी येत आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना बाराही महिने खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. टँकर लॉबीला राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा असून, टँकरने पाणी घ्यावे लागत असल्याने सभासदांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढ होत आहे. मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था विकसित होत आहेत. परिणामी, शहराची लोकसंख्या २७ लाखांवर गेली आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी महापालिका प्रतिदिन पवना धरणातून ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी), चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १३ असे ५९३ दशलक्ष लिटर पाणी उचलते. यापैकी ४० टक्के पाणीगळती व चोरी होत असल्याचे प्रशासन गेल्या पाच वर्षांपासून सांगत आहे. मात्र, त्यावर ठोस उपाय अद्याप सापडत नाही, अशी स्थिती आहे. मागील चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित, अपुरा व कमी दाबाने होतो. गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर

हेही वाचा >>> तुमचा आरोग्य विमा आहे? जाणून घ्या ‘कॅशलेस’ सुविधा न मिळण्याची कारणे…

पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागात कुणाल आयकॉन, साई पर्ल यांसह अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. या भागात लोकसंख्या मोठी आहे. मानकाप्रमाणे प्रतिदिन प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे पाणी देणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेकडून मुबलक पाणी दिले जात नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा असतानाही कमी वेळ पाणी सोडले जाते. अधिकाऱ्यांवर दबाव आणून कमी वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर लॉबीसाठी राजकीय लोकांच्या दबावातून असा प्रकार केला जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. अनेक भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, टँकर लॉबीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येते. टँकरमाफियांनी पाण्याच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमविले आहेत. त्यामुळे ही पाणी टंचाई या लॉबीला पोसण्यासाठी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार लागतो. बाराही महिने टँकरने पाणी घ्यावे लागतो. त्याचा अधिकचा आर्थिक भुर्दंड संस्थांना सहन करावा लागत आहे.

पाणी सोडण्याच्या वेळा ठरल्या आहेत. त्यानुसार पाणी सोडले जाते. कोणाच्या सांगण्यावरून पाणी कमी दाबाने सोडले जात नाही. छोट्या १३५, तर मोठ्या संस्थांमधील रहिवाशांना ९० लिटरप्रमाणे प्रतिदिन प्रतिमाणसी पाणी दिले जाते.

श्रीकांत सवणेमुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग

महापालिका एक दिवसाआडही मुबलक पाणी देत नाही. बंधनकारक असतानाही प्रतिदिन प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे पाणी दिले जात नाही. एका सदनिकेत पाच माणसे राहतात. त्यांना पाणी पुरत नसल्याने खासगी टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. त्याचा आर्थिक भार सहन करावा लागतो.सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशन