पुणे : अडीच वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा अमली पदार्थ तस्कर जेम्स डार्लिंगटन लायमो याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी फथकाने पकडले. त्याच्याकडून २३ लाख २६ हजार रुपयांचे कोकेन, तीन मोबाइल संच, दुचाकी जप्त करण्यात आले.

जेम्स मूळचा आफ्रिकेतील टांझानियाचा आहे. जेम्स अमली पदार्थ तस्कर आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. या प्रकरणात जेम्सच्या मित्राला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन महिन्यांपूर्वी तो हांडेवाडीतील जाधवनगर भागात राहायला आला होता. याबाबतची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून पोलिसांनी पकडले, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई

हेही वाचा – “अजित पवारांना ४४० चा करंट…”, चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवडच्या बैठकीत विरोधकांना दिले आव्हान

हेही वाचा – कसबा पोटनिवडणुकीत आज ‘हे’ उमेदवार चक्क प्रचार करणार नाहीत; कारण…

जेम्सविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल ‌झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, ज्ञानेश्वर घोरपडे, सुजीत वाडेकर, विशाल शिंदे, विशाल दळवी, विशाल पारधी, राहुल जोशी, नितेश जाधव यांनी ही कारवाई केली.

Story img Loader