पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि बारामती विभागासाठी १ सप्टेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, केवळ भाडेपत्रक (टेरिफ कार्ड) दाखवून प्रवाशांकडून वाढीव भाडे घेता येणार नाही. त्यासाठी मीटरचे प्रमाणीकरणच करणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> बनावट गुंठेवारी प्रकरणी पुणे , पिंपरी महापालिकेची फसवणूक उघडकीस ; १९ जणांविरोधात गुन्हे

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

सीएनजीच्या दरात झालेली वाढ आणि खटुआ समितीची शिफारस लक्षात घेऊन २७ ऑगस्टच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षासाठी अंतिम भाडेवाढ जाहीर करण्यात आली. रिक्षाच्या दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी सध्या २१ रुपये भाडे आकारणी केली जाते. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये आकारले जातात. नव्याने केलेल्या भाडेवाढीनुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आकारण्यात येतील. म्हणजेच पहिल्या दीड किलोमीटरसाठी चार रुपये, तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : नांदेड सिटी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ,परदेशी तरुणीसह तिघी ताब्यात; चौघांविरोधात गुन्हा

वाढीव भाड्याची आकारणी करण्यासाठी रिक्षा चालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय वाढीव भाड्याची आकारणी करता येणार नाही. मीटरच्या प्रमाणीकरणासाठी ३१ सप्टेेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मीटरच्या तपासणीसाठी शहरात पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. कर्वेनगर येथील अलंकार पोलीस स्थानकासमोर, फुलेनगर येथील आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेटमधील इगलबर्ग कंपनी लेन क्रमांक तीन, दिवे येथील चाचणी मैदान, इऑन आयटी पार्कजवळ खराडी पोलीस चौकीसमोर आदी ठिकाणी १ सप्टेंबरपासून सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत मीटर तपासणी करण्यात येणार आहे.

… तर रिक्षांवर कारवाई
वाढीव भाडेआकारणी करण्यासाठी रिक्षाच्या मीटरचे प्रमाणीकरणच आवश्यक आहे. मीटरमध्ये दिसणारे भाडे प्रवाशांकडून आकारले जावे. वाढीव भाडे घेण्यासाठी टेरिफ कार्डचा वापर केल्याचे आढळून आल्यास संबंधित रिक्षांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिला आहे.