पुणे : करबुडव्या २३ हजार ५०० मिळकती महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने शोधून काढल्या आहेत. या मिळकती कर कक्षेत आल्याने त्यांच्याकडून १४३ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधण्याची ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याने महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

शहराच्या जुन्या हद्दीमध्ये सुमारे अकरा लाख तर समाविष्ट गावांमध्ये दोन लाख मिळकतींना कर आकारणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली आहेत. त्यातील अनेक मिळकतींना कर आकारणी झाली नसल्याची तक्रार सातत्याने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. तर काही मिळकतींनी वापरात बदल केला आहे.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

हेही वाचा – पुणे : खासगी बसचे भाडे महागले! एसटीची सेवा बंद असल्याने प्रवाशांची लूट

मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. यंदा मिळकतकरातून १ हजार ८०० कोटींचे उत्पन्न अंदाजपत्रकात आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी गृहीत धरले आहे. तर मिळकतकरातून जवळपास ९ हजार कोटींची थकबाकी वसुलीचे कर आकारणी आणि कर संकलन विभागापुढे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीबरोबरच करबुडव्या मिळकतींचा शोध सुरू केला आहे. त्याअंतर्गत चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत २३ हजार ५०० मिळकतींचा शोध प्रशासनाने घेतला असून त्यासाठी मुख्य विभागाबरोबरच क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

मिळकतीच्या वापरात बदल, साइड मार्जिनचा व्यावसायिक वापर, अनधिकृत आणि कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधून काढण्यात येत आहेत. तसेच थकबाकी असलेल्या मिळकतींना सील लावण्याची कार्यवाही केली जात आहे. चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या मिळकतकर विभागाने थकबाकी असलेल्या ५३१ मिळकतींना सील ठोकले आहे. त्यांच्याकडे एकूण ३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

हेही वाचा – गोवा, सिंधुदुर्गमध्ये तीन दिवस पाऊस? हवामान विभागाचा अंदाज

गेल्या वर्षी मिळकतकर विभागाने वापरात बदल केलेल्या मिळकतींची तपासणी केली असता, या तपासणीत निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या १५ हजार २२९ मिळकती आढळून आल्या होत्या. त्यांच्याकडून १०१ कोटी ६६ लाख रुपये कर वसूल करण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षात २३ हजार ५०० मिळकतींचा शोध घेण्यात आला आहे. यामध्ये कर आकारणी न होण्याबरोबरच वापरात बदल करण्यात आलेल्या मिळकतींचा समावेश आहे.

कर आकारणी आणि कर संकलन विभागाने २३ हजार ५०० मिळकती नव्याने कर कक्षेत आणल्या आहेत. त्यातून महापालिकेला १४३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. येत्या काळातही ही मोहीम सुरू राहणार आहे. – अजित देशमुख, उपायुक्त, कर आकारणी आणि कर संकलन विभाग, पुणे महापालिका