लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील ८७ हजार ४५६ मालमत्ताधारकांनी २०२३-२४ च्या आर्थिक वर्षातील अवघ्या दीड महिन्यात शंभर कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. यामधील ७० हजार मालमत्ता धारकांनी ऑनलाईन कराचा भरणा करून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.

शहरात औद्योगिक, निवासी, बिगर निवासी, मिश्र आणि मोकळ्या जमीन अशा पाच लाख ९८ हजार मालमत्ता आहेत. महिला बचत गटांनी शहरातील निम्म्यापेक्षा जास्त मालमत्ता धारकांना घरपोच देयकांचे वाटप आणि माहितीचे अद्ययावतीकरण केले आहे. याचाच परिणाम म्हणून अवघ्या दीड महिन्यात ८७ हजार ४५६ मालमत्ता धारकांनी शंभर कोटी ७२ लाखांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. याचबरोबर ३१ मार्च २०२३ अखेर ज्यांची एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी होती, अशा २२ हजार मालमत्तांना जप्तीपूर्व नोटीस देण्याचे मालमत्ताकराच्या देयकाबरोबर देण्याचे काम सुरू आहे. देयकांचे वाटप होताच जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

आणखी वाचा-पुण्यदशम बसचे ‘दशा’वतार! आरटीओने झटकले हात, तर पीएमपी हतबल

ऑनलाईन कर भरण्याकडे कल

शहरात हिंजवडी, तळवडे या भागात नामांकित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये अभियंता म्हणून काम करणारे अनेक मालमत्ता धारक ऑनलाईन कर भरण्यास पसंती देत आहेत. त्यामुळेच ८७ हजार कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांपैकी तब्बल ७० हजार ४८९ मालमत्ता धारकांनी ८० कोटी ऑनलाईन कराचा भरणा केला आहे.

३० जूनपूर्वी वार्षिक उद्दिष्टाच्या पन्नास टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३० जूनपूर्वी आपल्या संपूर्ण मालमत्ता कराचा भरणा करावा. -नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका