जीएसडीएचा नगरविकास विभागाला प्रस्ताव

प्रथमेश गोडबोले

Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

पुणे : राज्यात ज्या भागात भूजल कमी आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त हस्तांतरण विकास हक्क (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स – टीडीआर) आणि चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) नको, असा प्रस्ताव भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून (ग्राउंड वॉटर सर्वेज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी – जीएसडीए) राज्याच्या नगरविकास विभागाला पाठविण्यात आला आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थळ-काळानुरूप पाण्याच्या उपलब्धतेबाबत शाश्वती राहिलेली नाही. अतिवृष्टी आणि दुष्काळ यासारख्या टोकाच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्याचे प्रत्यंतर पाहायला मिळत आहे. कृषी, उद्योग, ऊर्जा, पर्यावरण आणि पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पाण्याची उपलब्धता अनिश्चित झाल्यास या घटकांना मागणीनुसार पाणी पुरवण्यावर मर्यादा येणार आहेत. परिणामी मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा परिस्थितीत पाण्यावर अवलंबून असलेले उद्योग, व्यवसाय आणि सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी नुकताच  देशासाठीचा २०२२ चा वास्तविक भूजल स्रोत मूल्यांकन अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार राज्यातील ८० तालुक्यांमध्ये मध्यम ते अति या प्रमाणात भूजल पातळी कमी आहे.

या पार्श्वभूमीवर जीएसडीएकडून नगरविकास विभागाला हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दरम्यान, ‘भूजल कमी असलेल्या भागात नागरीकरण झाल्यास संबंधित भागात बाहेरून पाण्याची व्यवस्था करावी लागते. केंद्राकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या भूजल स्रोत मूल्यांकन अहवालात राज्यातील ८० तालुक्यांत पाणीटंचाई असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात भूजल कमी असलेल्या ठिकाणी जादा टीडीआर, एफएसआय नको’, असा प्रस्ताव नगरविकास खात्याला पाठविण्यात आल्याचे जीएसडीएकडून सांगण्यात आले. 

शहर म्हणून नियोजन करताना कोणत्या भागात किती भूजल आहे, हे पाहून नियोजन करावे, असा आमचा प्रस्ताव आहे. ज्या ठिकाणी भूजल कमी आहे, त्याठिकाणी अतिरिक्त टीडीआर आणि एफएसआय नको, असे नगरविकास विभागाला सुचविले आहे. 

– चिंतामणी जोशी, आयुक्त, जीएसडीए

Story img Loader