प्रजासत्ताकदिनी चहाविक्रेत्याच्या योजनेला चार हजार जणांचा प्रतिसाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून हिंजवडीत एक रूपयात चहा आणि मस्का पाव देण्याचा उपक्रम एका चहाविक्रेत्याने राबवला. पहाटे पाच पासून रात्री अकरापर्यंत सुमारे चार हजार जणांनी या सवलतीचा लाभ घेतला. त्यामध्ये अर्थातच हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा भरणा अधिक होता.

हिंजवडीतील वाकळे अमृततुल्यचे चालक नीलेश वाकळे यांनी राबवलेल्या या एकदिवसीय उपक्रमाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीतरी वेगळे करावे, या विचारातून ही कल्पना पुढे आली. त्यानुसार, शनिवारी पहाटे पाच वाजता एक रूपयात चहा आणि मस्का पाव देण्यास सुरूवात करण्यात आली. हळूहळू ग्राहकांची संख्या वाढत गेली. परिसरातील झेंडावंदनाचे कार्यक्रम उरकल्यानंतर ही गर्दी मोठय़ा प्रमाणात वाढली. दिवसभर तसेच रात्री अकरा वाजता शेवटचे ग्राहक येईपर्यंत हेच चित्र होते. जवळपास चार हजार नागरिकांनी वाकळे यांच्या चहा आणि मस्का पावाचा स्वाद घेतला.

जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या नीलेश वाकळे यांनी हिंजवडी आयटी पार्क येथे हातगाडी टाकून या व्यवसायाची सुरूवात केली होती. यापूर्वी इतर व्यवसाय त्यांनी केले होते. त्यात यश मिळाले नाही. मात्र, चहाविक्रीच्या व्यवसायाने त्यांची मोठी प्रगती झाली. नोकरीच्या मागे न लागता तरूणांनी व्यवसायचा विचार करावा. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. परिश्रमपूर्वक काम केल्यास यशाची पायरी निश्चित गाठता येते, असे वाकळे यांनी म्हटले आहे.