पाषाण येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बावीस विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या अतिथी शिक्षकाला विशेष न्यायालयाने एक मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
प्रदीप बळवंत घोटसकर (वय ५०, रा. पाषाण) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घोटसकर हा २०११ पासून अतिथी शिक्षक म्हणून लेखनकौशल्य हा विषय शिकवतो. घोटसकर याच्या विरुद्ध पाचवीच्या मुलीने लैंगिक छळ केल्याची तक्रार शाळेकडे केली. त्यानुसार शाळेने याप्रकरणाची चौकशी केली असता घोटसकर याने शाळेच्या मैदानात, शाळेत आणि बाहेर शिकविण्यासाठी घेऊन गेल्यावर वीस ते बावीस विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी त्याला अटक करून त्याला विशेष न्यायालयात हजर केले गेले असता १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher arrested in case of sexual harassment
Show comments