पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या शाळांसह जुन्या हद्दीतील शिक्षकांच्या रिक्त ३५५ जागा भरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठीच्या बिंदुनामावलीस अंतिम मान्यता मिळविण्यासाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमधून सव्वा लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक वर्षात शिक्षक भरती न झाल्याने शिक्षकांची संख्या अपुरी आहे. शिक्षकांअभावी एकाच शिक्षकांवर दोन-दोन वर्गांची जबाबदारी देण्यात आली असून त्याविरोधात पालक, शिक्षकांनी आंदोलनेही केली आहेत.

Supreme Court On Mahakumbh Stampede
Supreme Court : “ही दुर्दैवी घटना, पण…”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला दिले ‘हे’ आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
pune After protests in Chikhli Kudalwadi municipal administration gave six days to remove unauthorized constructions
पिंपरी : अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी व्यावसायिकांना सहा दिवसांची मुदत, महापालिका, पोलीस प्रशासन आणि व्यावसायिकांंच्या बैठकीत निर्णय
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
Motor Accident Claims Tribunal , vacancies ,
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे कधी भरणार ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
MLA Jorgewar organized BJP workers meeting and guardian minister felicitation program here.
पालकमंत्र्यांच्या सत्कारासाठी सभागृह देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार; मनाई असतानाही आमदार किशोर जोरगेवार यांनी…

महापालिकेकडील आकडेवारीनुसार शिक्षकांच्या ६५० जागा रिक्त आहेत. मात्र राज्य शासनाने रजा मुदतीमधील ९३ शिक्षकांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंतरजिल्हा बदली पद्धतीनुसार काही शिक्षक महापालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे सध्या रिक्त जागांची संख्या ३५५ एवढी आहे. ही पदभरती येत्या काही दिवसांत केली जाणार आहे.

शिक्षण विभागातील शिक्षकांची बिंदुनामावली तयार करून ती राज्य शासनाकडे महापालिकेने मंजुरीसाठी पाठवली आहे. राज्य शासनाने उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर केली आहे. मात्र, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर झालेली नाही. येत्या काही दिवसांत त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’साठी शिक्षण विभागाची धावाधाव, नेमके झाले काय?

दरम्यान, जुन्या हद्दीतील शाळांबरोबरच समाविष्ट गावांनाही पदभरतीनंतर शिक्षक दिले जाणार आहेत. समाविष्ट गावांतील ६५ पैकी ६१ शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. उर्वरित शाळा येत्या काही दिवसांत हस्तांतरित होणार आहेत.

Story img Loader