पुणे : शिक्षक सध्या बिघडण्याच्या मार्गावर आहेत. ते शाळांमध्ये तासिका किती घेतात, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती तयारीने येतात, अद्ययावत तंत्रज्ञान किती मिळवतात असे अनेक विषय आहेत, असे विधान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. शिक्षकांना मोदीजी कामाला लावणार आहेत. उदाहरणार्थ, अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनांतील शिक्षकांना पुढील वर्षापासून आठवड्यातून एक दिवस उद्योगांना भेट देणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यातून २० वर्षांपूर्वी शिकलेले तंत्रज्ञान अद्ययावत करता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्ष, पुणे विकास प्रतिष्ठान आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात पाटील बोलत होते. या कार्यक्रमात ७४५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, ॲड. एस. के जैन, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, शेखर मुंदडा, वर्षा डहाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारात चंदन चोरी

पाटील यांच्या हस्ते पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरण कुमार बोन्दर, डॉ. अरविंद पांडे, डॉ. विनय कुमार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासह काही विशेष सन्मान करण्यात आले. पाटील म्हणाले, की ऋतुजा, नम्रता असे गुण विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या वागण्यातून मिळतात. अशा गुणांमुळे विद्यार्थी शिक्षकांना लक्षात ठेवतात. शिक्षक समाजाचा आधारस्तंभ आहेत. आम्ही शिक्षकांचे सगळे विषय मार्गी लावू. मात्र, तुमचे ध्येय आणि कार्य हे फार मोठे आहे. जगात नव्याने घडणाऱ्या घटनांच्या मागे शिक्षकच असतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher responsibility narendra modi teachers will put to work statement by chandrakant patil pune print news ccp 14 ysh