मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी विधीचे मंत्रोच्चारण करणारे गुरुजी

मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी विधीचे मंत्रोच्चारण करणारे.. गेल्या २५ वर्षांत किमान तीन लाखांहून अधिक नागरिकांवर अंत्यसंस्काराचे विधी करणारे.. ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधी यथासांग पार पडण्यासाठी योगदान देणारे.. सामाजिक संस्थांना यशाशक्ती अर्थसाह्य़ करणारे.. सुरेंद्र उर्फ भैया मोघे गुरुजी ‘सव्य-अपसव्य’मधून आता निवृत्त झाले आहेत.  चिरंजीव अमरनाथ मोघे यांनी अंत्येष्टी विधीच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर मोघे या व्यवसायातून स्वेच्छेने मुक्त झाले आहेत. प्रकृती सुदृढ असताना अंत्येष्टीच्या कामातून निवृत्त होणारे सुरेंद्र हे मोघे घराण्यातील पहिलेच गुरुजी ठरले आहेत.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
aishwarya narkar gives tips for couple to save money
“घर घ्यायचं ठरलं तेव्हा, वर्षाला २ लाख…”, संसारात पैशांची बचत कशी करावी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Image Of L& T Chairman
रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्यक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये

पेशवाईच्या कालखंडात पानिपत रणसंग्रामामध्ये धारातीर्थी पडलेल्या योद्धय़ांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांज्याजवळील पडवण या गावाहून मूळचे कोकणातील मोघे कुटुंबीय पुण्याला आले. अंत्येष्टीचे विधी हा व्यवसाय करणारा मोघे कुटुंबीयांच्या पाचव्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. खरे तर या व्यवसायामध्ये काम करण्याची इच्छा नव्हती. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मी छोटी-मोठी कामे करू लागलो. ‘एक वेळ कटोरा घेऊन भीक मागेन, पण या व्यवसायात येणार नाही’, असे मी वडील रघुनाथ मोघे यांना सांगितले होते. मी स्प्रे पेंटिंगचे काम केले. त्यानंतर प्लॅस्टिक पाईप निर्मिती करणाऱ्या वर्कशॉपमध्ये काम करू लागलो. त्याचवेळी आजारपणामुळे वडिलांना या व्यवसायातून सक्तीने निवृत्त व्हावे लागले. मग, गरज म्हणून मी या व्यवसायामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ३४ व्या वर्षी दीपक पाध्ये यांच्याकडून शिक्षण घेतले. मंत्राग्नीचा शेवटचा भाग काका पुरुषोत्तम मोघे यांनी शिकविला. मी जेथे काम करीत होतो तेथील मुस्लिम सहकारी माझे कामही करायचा आणि मला पाठांतर करण्यासाठी वेळ द्यायचा. त्यामुळे मी व्यवसायामध्ये येण्याचा निर्धार पक्का केला. एकेका आठवणीतून सुरेंद्र मोघे जणू आपले आयुष्य उलगडत होते.

सुरुवातीला सहा वर्षे वैकुंठ स्मशानभूमीत काम करताना २४ तास उपलब्ध असायचो. त्यावेळी दोन काका, तीन चुलत भाऊ असे आम्ही सर्व या क्षेत्रात काम करीत होतो. त्यानंतर माझ्या जोडीला मििलद वैद्य गुरुजी आले. ओंकारेश्वर येथे काम करताना मी दशक्रिया विधीचे मंत्र शिकून घेतले. आता अजित, प्रशांत आणि अनंत यांच्याबरोबरीने मिलिंद वैद्य यांचा मुलगा मयूर हादेखील काम करीत आहे.

या व्यवसायातून मिळालेल्या पैशांतून काही निधी मी सामाजिक कामांसाठी देतो. सुरुवातीला यमगरवाडी मित्र मंडळ आणि आता सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या गुरुकुलम या संस्थेतील विद्यार्थ्यांना पंचे, धान्य अशा स्वरूपाची मदत करतो. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये समाजातील उपेक्षित घटकांसमवेत कर्मचारी दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. आता उर्वरित जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रासाठी यथाशक्ती काम करण्याची इच्छा आहे, असेही मोघे यांनी सांगितले.

अंत्येष्टी विधीमागेही विज्ञान

सध्या विज्ञानाचे युग आहे. विवेकी विचारांतून अंत्येष्टी विधी हे कर्मकांड आहे अशा भावनेतून अनेकजण अंत्यसंस्कार केल्यानंतरचे विधी करणे टाळतात. मात्र, या नंतरच्या विधीमागेही विज्ञान अंतर्भूत आहे हे सांगितले गेले तर असे लोक पुन्हा तेराव्यापर्यंत विधी करण्याकडे वळतील, असा विश्वास सुरेंद्र मोघे यांनी व्यक्त केला. असे विधी न करणारे नागरिक आणि दशक्रिया विधी हा भागच नसल्याने अनेकजण ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने विधी करण्याकडे वळत आहेत. त्यामुळे सध्या तरी आमच्याकडे असणारे मनुष्यबळ पुरेसे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader