पुणे: गणित म्हटले तरी अनेकांना शाळा-कॉलेज नको वाटते; परंतु हाच गणिताचा विषय खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अत्यंत सोपा केला आहे. कॉलेजमधील मुले, मुली हसतखेळत आणि विशेष म्हणजे गात गणिताची सूत्रे (फॉर्म्युले) पाठ करत आहेत. हिंदी गाणे, रॅप साँग, लावणी, लोकगीतांच्या चालींवर गणिताच्या सूत्रांची मांडणी केल्याने विद्यार्थ्यांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

अभिजित भांडारकर असे अत्यंत अभिनव पद्धतीने गणिताची सूत्रे मांडणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या या शिक्षण पद्धतीची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. गाण्यांच्या चालींवर मांडणी करून फॉर्म्युले बनविण्याची एक रंजक गोष्ट आहे. अभिजित भांडारकर हे गणित विषयात तीन ते सहा वेळा नापास झाले होते. म्हणून त्यांनी आपल्यावर जी परिस्थिती ओढवली ती इतर मुलांवर येऊ नये म्हणून शिक्षण पूर्ण करून अनोख्या पद्धतीने गणिताचे फॉर्म्युले मांडले.

Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

आणखी वाचा- पुणे: आता ग्रामपंचायत स्तरावरून हवामानाच्या नोंदी; भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डीत अनोख्या पद्धतीने गणिताची सूत्रे (फॉर्म्युले) शिकवली जात आहेत. बॉलीवूड सॉंग, रॅप साँगच्या चालीवर १ हजार ८० फॉर्म्युले बसविण्यात आले आहेत. ते मुलांच्या डोक्यात अगदी फिट्ट राहतात. बहुतांश मुलांना गणित विषय म्हटले तरी ताण यायचा, पण आता हीच मुले मोठ्या आवडीने गणित शिकत आहेत, अशी माहिती अभिजित भांडारकर यांनी दिली. २००७ मध्ये अवघ्या दोन मुलांसह त्यांनी खासगी शिकवणीची सुरुवात केली. बॉलीवूड साँग आणि रॅप सॉंगवर ते गणिताचे फॉर्म्युले म्हणायचे. अगोदर त्यांना अनेकांनी वेड्यात काढले, टिंगल-टवाळी केली, पण आज त्याच क्लासमध्ये ५०० पेक्षा अधिक मुले, मुली अनोख्या शिक्षणपद्धतीचे धडे घेत आहेत. गणित विषय हा खूप कंटाळवाणा. मला तो विषय अजिबात आवडत नाही, असे म्हणणारी मुले, मुली आवर्जून आणि काही तास क्लास करून गणिताचे फॉर्म्युले पाठ करत आहेत. कॉलेजमध्ये कंटाळवाणा वाटणारा गणित विषय आता मुलांना आवडू लागला आहे. काठावर पास होणारी मुले ८० टक्क्यांच्या पुढे गुण घेत आहेत, अशी माहितीदेखील भांडारकर यांनी दिली आहे.

Story img Loader