लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांना सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. एप्रिलपासून शिक्षकांच्या प्रशिक्षण मोहीम राबवली जाणार असून, त्यात एकूण २३ विषयांचा समावेश आहे.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेतील शिक्षकाने सातत्यपूर्ण व्यावसायिक विकसनासाठी किमान ५० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ समितीकडून आराखडा मागवण्यात आला होता. तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार प्रशिक्षण मोहीम राबवली जाणार आहे. सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांपैकी शासकीय, शासकीय अनुदानित, सार्वजनिक खासगी भागीदारीअंतर्गत (पीपीपी) चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षकांचा या प्रशिक्षणात समावेश असेल. दोन प्रकारच्या या प्रशिक्षणात पहिल्या प्रकारांतर्गत सामान्य प्रशिक्षण, दुसऱ्या प्रकारात विषयकेंद्री प्रशिक्षण असेल. सामान्य प्रशिक्षणात किशोरवयीन शिक्षण प्रशिक्षण, कला प्रशिक्षण, सर्व समावेशक शिक्षण, आनंददायी वर्ग, सायबर सुरक्षा अशा विषयांचा समावेश आहे, तर विषयकेंद्री प्रशिक्षणात दहावी, बारावीच्या वर्गांशी संबंधित २३ अभ्यासक्रमांचा समावेश असल्याची माहिती सीबीएसईकडून देण्यात आली.

प्रशिक्षणामध्ये प्रत्येक राज्याकडून केंद्रीय पातळीवर एप्रिल ते मार्च दरम्यान प्रशिक्षण सत्रांचे वेळापत्रक तयार केले जाईल. त्यात शिक्षकांना २५ तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. तर उर्वरित २५ तासांचे प्रशिक्षण शाळा स्तरावर विषयानुरूप होईल. प्रशिक्षणासाठीची नोंदणी सीबीएसई प्रशिक्षण संकेतस्थळाच्या माध्यमातून होणार असल्याचे नमूद करण्यात आले.

देशभरात १६ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना

नुकतेच लडाख आणि उत्तर प्रदेश येथील १२४ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शासकीय शाळांना सीबीएसईची संलग्नता प्राप्त झाली आहे. आंध्र प्रदेशातील एक हजार शाळांही सीबीएसईशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच सीबीएसईकडून संलग्न शाळांतील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी देशभरात विविध ठिकाणी १६ सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती सीबीएसईने दिली.