‘या पुढील काळात विद्यार्थ्यांला शिकण्यास मदत करणे हीच शिक्षकाची भूमिका असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांशी मेंदूच्या पातळीवर नाही तर हृदयाच्या पातळीवर संवाद साधावा लागेल,’ असे मत एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी माईर्स एमआयटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. शहरातील विविध संघटना, शाळा, महाविद्यालयांमध्ये गुरुवारी शिक्षकदिन साजरा करण्यात आला.
माईर्स एमआयटीमध्ये शिक्षकदिनानिमित्त संस्थेतील गुणवान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, आयसीसीआरचे उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठामध्येही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सोनावणे आदी उपस्थित होते.
यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यशदाचे माजी संचालक डॉ. सदानंद नायर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. मुकुंद अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष अॅड. लोखंडे, सरचिटणीस दीपक लोंढे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी शिंदे कला महाविद्यालयामध्येही गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून शिक्षकदिन साजरा करण्यात आला. आचार्य श्री विजय वल्लभ शाळेमध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून वर्गावर नियंत्रण ठेवले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कमिटीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णकांत जाधव आदी उपस्थित होते. पुणे शहर काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या वतीने माजी प्राचार्य विद्या शेलार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे शहर काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार उपस्थित होत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातर्फे गोखलेनगर येथील गणपतराव विठोबा गोळे माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका अॅड. पद्मजा गोळे उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा