पुणे : राज्यातील शाळांमध्ये सहामाही परीक्षा संपून दिवाळीच्या सुटीचे वेध लागले असताना आता १९६७ पूर्वीच्या मराठा कुणबी, मराठा विद्यार्थ्यांचे दाखले, नोंदी शोधण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आता शाळेतील जुनी कागदपत्रे, नोंदी काढून शोध घ्यावा लागणार असून, वेळेत काम पूर्ण न झाल्यास दिवाळीच्या सुटीतही शाळेत येऊन काम करावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड: दिपावलीमध्ये आतषबाजी करण्यासाठी वेळेचे बंधन?…या वेळेत

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “…तर रक्तरंजित क्रांती करणार”, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची भरसभेत धमकी
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. तसेच मराठा समाजाला मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील शाळांतील १९६७पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या मराठा, मराठा, कुणबी असल्याचे दाखले, नोंदी शोधण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यात दाखले, नोंदी शोधून स्कॅन करून त्याची माहिती ११ नोव्हेंबरपूर्वी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा स्तरावर बैठका घेऊन दाखले, नोंदणी शोधण्याचे काम करण्याच्या सूचना राज्यातील शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. या नोंदी, दाखले शोधण्याची कार्यपद्धतीही ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास साठ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे शोधण्याचे काम आता शिक्षकांना करावे लागणार आहे. तसेच दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास दिवाळीच्या सुटीत बोलावले जाण्याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कागदपत्रे सादर करणे अनिवार्य

शाळांमध्ये सहामाही परीक्षा असतानाही शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणुकीची कामे करावी लागली. त्यात आता कुणबी नोंदणी शोधण्यासाठी ६० वर्षांपूर्वीची कागदपत्रे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामाचा शिक्षकांवर ताण पडणार आहे. दिवाळीची सुटी लक्षात घेऊन अनेकांनी गावी जाणे, सहलीला जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, तातडीचे काम आल्याने आता सर्व नियोजन कोलमडणार आहे. तसेच त्यात काही चुका, उणिवा राहिल्यास, विलंब झाल्यास त्याचाही मनस्ताप शिक्षकांनाच सहन करावा लागणार आहे, असे काही शिक्षकांनी सांगितले.

मोडी लिपी, सीमा भागात अन्य भाषा येणाऱ्यांची गरज अनेक जुनी कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्यामुळे जुन्या नोंदी शोधण्यासाठी आता मोडी लिपी वाचता येणाऱ्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच सीमेवरील गावांमध्ये त्या भाषा येणाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.