पुणे शहराला पुण्यश्वर मंदिरामुळे ओळख आहे. त्यामुळे मला सरकारला सांगायचे आहे की, येत्या काळात ज्या सरकारला बहुमत हव आहे. त्या सरकारने पुण्यश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करावे. तुम्ही बुलडोझर तयार ठेवा. तुमच्यासोबत हिंदू सरकार असून पुण्यश्वर मंदिराच्या जागी भव्य अस महादेवाच मंदिर उभारण्यात यावे, अशी मागणी तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर यांनी केली आहे. पुण्यात सकल समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चात ठाकूर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लाल महाल ते डेक्कन डेक्कन येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मारकापर्यन्त सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार भीमराव तापकीर, तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई,निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले होते.
आमदार राजा भैया ठाकूर म्हणाले की, मी आज पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाला आलो आहे. हा आक्रोश नसून गर्जना आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या दिवशी मारलं त्या दिवसाला धर्मवीर दिन म्हणून घोषित करा अशी माझी मागणी आहे. जोवर आपली मागणी होत नाही.तोपर्यंत आपला लढा सुरू असला पाहिजे.तसेच देशात अनेक ठिकाणी लव्ह जिहाद, धर्मांतर, गो हत्या सारख्या घटना समोर येत आहे.या विरोधात कायदा झाला पाहिजे.देशात लव्ह जिहादचे षडयंत्र पसरले असून ते उखडून टाकायचे आहे.या बाबत कायदा जर झाला नाही. तर आपल्या माता भगिंना सुरक्षित कशा राहतील. जो लांडा किसी बेहेन को देखेगा उसकी आखे हमे निकालनी आती है, असे विधान त्यांनी केले.
हेह वाचा- ‘छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच’; आमदार शिवेंद्र राजे भोसलेठ
तसेच ते पुढे म्हणाले की, धर्मांतर विरोधात सुद्धा एक कायदा तयार झाला पाहिजे. जो धर्मांतर करेल त्याला खड्ड्यात तीन फूट खोदा आणि गाढून टाका. मी २००५ मध्ये केले. त्यामुळे माझ्या भागात धर्मांतर झाल नाही आणि होत नाही. तसेच गाय आमची माता आहे. तिला आम्ही कापू देणार नाही. कायदा बनवा नाही. तर आम्ही कसाई यांना छाटू अशी भूमिका त्यांनी मांडली. मी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली आहे. त्यामुळे लवकरच पुण्येश्वरच्या आरतीला देखील येणार असून तुमच्या येथे पण एक अयोध्या आहे. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे, असेही ठाकूर म्हणाले.