सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटिग्रेटेड टेलिमेडिसिन सर्व्हिसेसच्या उद्घाटनानंतर विद्यापीठाकडून दत्तक घेण्यात आलेल्या २२ गावांमध्ये टेलिमेडिसिन सेवा पुरवली जाणार आहे. शनिवारी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी अशा सर्व वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांचे उपचार ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणे शक्य होणार आहे.
सोनोवाल यांना टेलिमेडिसिन तज्ज्ञांद्वारे रुग्णांना प्रदान केलेल्या उपचारांचे थेट प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>प्रेयसीच्या खूनप्रकरणी पत्रकाराला अटक

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ हेल्थ सायन्सेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिमरिसर्च २०२२’ या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात सोनोवाल सहभागी झाले. या वेळी प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.सुभाष रानडे आणि डॉ. सुनंदा रानडे यांना सोनोवाल यांच्या हस्ते गौरवण्यात आले. शहरातील आयुष वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांच्या समस्या जाणून घेऊन सोनोवाल यांनी त्यांचा सन्मान केला.