पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर धरण पुढील दुरुस्तीसाठी रिकामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरण रिकामे झाल्यानंतर पुढील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सध्या खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी सिंचन आवर्तन सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता टेमघर धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येत आहे, तर खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यातून १००५ क्युसेक वेगाने ग्रामीण भागासाठी पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील लव्हार्डे येथे टेमघर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे काम २००० मध्ये सुरू होऊन २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा याठिकाणी करण्यात येत होता. या धरणाची क्षमता ३.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. सन २०१६ मध्ये धरणातून पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सन २०१७ मध्ये जलसंपदा विभागाकडून धरण दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली.

dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
GBS , Pune, GBS affected area,
पुणे : राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान जीबीएसचे बाधित क्षेत्र घोषित!
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण

हेही वाचा – पुणे : राष्ट्रीय स्मारक आणि मजूर भवनाच्या मागणीसाठी बाबा आढाव यांचे मजुर अड्डा येथे लाक्षणिक उपोषण

राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी या धरणाला भेट देऊन या कामांची पाहणी केली. टेमघर धरणाची गळती रोखण्याची कामे करताना आलेल्या तांत्रिक, प्रशासकीय अडचणी याबाबत प्राधिकरणाने माहिती घेतली. विशिष्ट पद्धतीने तयार केलेले सिमेंट व इतर रसायनांचे मिश्रण धरणात निर्माण झालेल्या पोकळ्यांमध्ये सोडून त्याद्वारे धरणातील पोकळ्या भरून काढण्यात आल्या. या कामाला ‘ग्राउटिंग’ असे म्हणतात.

धरणाच्या पाण्याकडील बाजूस विशिष्ट पद्धतीने तयार केलेले सिमेंट व इतर रसायनांच्या मिश्रणातून तयार केलेल्या काँक्रिटचा लेप देण्यासाठी मिक्स संकल्पन आणि कार्यपद्धती विकसित करण्यात आली. त्याला शॉर्टक्रीट या नावाने ओळखले जाते. शॉर्टक्रीटमुळे धरणातील पाणी पाझरून धरणात जाण्यास अटकाव होतो. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राउटिंग, शॉर्टक्रीट आतापर्यंत कोणत्याही धरणात करण्यात आले नव्हते. त्यामुळे या तंत्रज्ञानाची कार्यपद्धत विकसित करून त्यानुसार सन २०१७ ते २०२० या दरम्यान टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. या कामामुळे धरणातील गळतीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

हेही वाचा – ससूनचे निवासी डॉक्टर संपावर, बाह्यरुग्ण विभागातील सेवा विस्कळीत

दरम्यान, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या नियोजनानुसार ग्रामीण भागासाठी सिंचन आवर्तन सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता टेमघर धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यात १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. टेमघर धरण रिकामे केल्यानंतर दुरुस्तीची उर्वरित कामे करण्यात येणार आहेत, असेही कोल्हे यांनी सांगितले.

Story img Loader