पुणे : दिवसा निरभ्र आकाशाची स्थिती आणि समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे संध्याकाळनंतर तयार होणाऱ्या ढगाळ स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला आहे. राज्याच्या बहुतांश भागांत निम्मा डिसेंबर कडाक्याच्या थंडीविना गेला. मात्र, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात गारवा अवतरण्याची शक्यता आहे.

 डिसेंबरमध्ये दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम ९, १० डिसेंबरच्या कालावधीतच कमी होता. याच काळात राज्यभर काही प्रमाणात गारवा जाणवत होता. मात्र, त्यापूर्वी आणि त्यानंतर राज्यातील थंडीवर समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ांनी परिणाम केला. त्यामुळे डिसेंबरमध्ये बहुतांश वेळेला रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते ६ अंशांनी वाढलेले होते. त्यामुळे थंडी पूर्णत: गायब झाली. दक्षिण कोकणसह काही भागांत पावसाच्या हलक्या सरींनीही हजेरी लावली. सध्याही मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, नाशिक, डहाणू, कोल्हापूर, नांदेड, परभणी, अकोला आदी भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ५ ते ७ अंशांनी वाढले आहे. मुंबई परिसरात २४ अंशांवर किमान तापमानाची नोंद होत आहे. दिवसाचे कमाल तापमानही मुंबई आणि कोकणात सर्वाधिक आहे. रविवारी रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. राज्याच्या इतर सर्वच भागांत किमान तापमान ३० ते ३२ अंशांच्या आसपास आहे. विदर्भातच काही भागांत कमाल, किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे.

Mumbai temperature, drop in temperature,
मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mumbai heat loksatta news
मुंबई : उकाड्यात वाढ
Temperature maharashtra, climate change,
थंडी आणखी दोन दिवस; पुन्हा तापमान वाढणार, जाणून घ्या हवामानातील बदल कशामुळे
Mumbais maximum temperature rise with Santacruz recording 35 Celsius
मुंबईकर घामाघूम
decrease in Mumbai s minimum temperature maximum temperature
सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Minimum temperature in Mumbai , Mumbai temperature drops ,
मुंबईतील किमान तापमानात ४ अंशांनी घट
2024 was hottest since 1901 with 0 65 Celsius rise in average temperature
देशाच्या तापमानात ०.६५ अंश सेल्सिअसने वाढ जाणून घ्या, २०२४ मधील देशाच्या हवामान क्षेत्रातील घडामोडी

बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. मात्र, सध्या उत्तरेकडील पंजाब, उत्तर राजस्थान, हिमाचल प्रदेशात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. परिणामी काही प्रमाणात गारवा जाणवणार आहे. मात्र, लगेचच मोठय़ा प्रमाणावर तापमानात घट होणार नाही. डिसेंबरच्या अखेरीस मात्र गारव्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

तापमानात वाढ का?

’उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा काही प्रमाणात प्रभाव असल्याने नोव्हेंबरचे काही दिवस थंडीचे होते.

’डिसेंबरमध्ये मात्र राज्यातील

तापमान सरासरीखाली राहण्याचा अंदाज असताना बंगालच्या उपसागरात आणि त्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांनी वातावरण बदलून टाकले.

’बंगालच्या उपसागरातील मंदौस चक्रीवादळाने सर्वाधिक परिणाम साधला. राज्याकडे येणारे बाष्प आणि त्यामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडी पूर्णपणे झाकोळली.

’रात्रीचे किमान तापमान १० ते १२ अंशांवर अपेक्षित असताना ते अनेक भागांत २० अंशांपुढे गेले.

’दिवसाचे कमाल तापमानही ३० ते ३२ अंशांपुढे नोंदविले गेले. त्यामुळे दिवसा चटका आणि रात्री उकाडा अशी स्थिती निर्माण झाली.

Story img Loader