पुणे : राज्यभरात उन्हाचा पारा वाढला असताना शहरातही उन्हाचा चटका वाढला आहे. शहराचे सरासरी तापमान ३७.३ अंश सेल्सिअसवर गेले असून, लवळे येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी लवळे येथे ४०.१, लोहगाव, मगरपट्ट्यात ३७.८, चिंचवडमध्ये ३८.५ आणि पाषाणमध्ये ३७.२, शिवाजीनगरमध्ये ३७.३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने शहर आणि परिसरात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा…पिंपरी : मोशीतील कचऱ्याच्या ‘बायोमायनिंग’मुळे महापालिकेस २५ एकर जागा

लवळेत एकीकडे कमाल तापमान सर्वाधिक असताना किमान तापमानही सर्वाधिक २४.१ अंश सेल्सिअस होते. त्या खालोखाल मगरपट्टा २२.४, चिंचवड २१.८, कोरेगाव पार्क २१.४, बालेवाडी १९.८, वडगाव शेरी १८.०, पाषाण १७.८, लवासा १७.२, शिवाजीनगर १६.५, हवेली १६.० आणि एनडीएत १५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा…पुणे : सिंहगड रस्त्यावर किरकटवाडीत अफूची शेती

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पारा चढाच होता. खेडमध्ये २१.०, पुरंदरमध्ये २१.०, भोरमध्ये २०.२, आंबेगावात १९.९, इंदापुरात १९.२, लोणावळ्यात १८.१, राजगुरुनगरमध्ये १६.७, नारायणगावात १६.५ आणि शिरुरमध्ये १५.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.