फग्युर्सन रस्त्यावरील गुडलक चौक ते फग्युर्सन महाविद्यालयाचे प्रवेशद्वारया दरम्यानची उजवी बाजू नो-पार्किंग करण्याच्या निर्णयात वाहतूक विभागाकडून बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी मोटारींना पार्किंगला परवानगी दिली असून काही भागावर नो-पार्किंगचा निर्णय कायम ठेवला आहे. हा निर्णयही तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.
फग्युर्सन रस्त्यावरील सुरक्षिततेच्या कारणावरून गुडलक चौक ते फग्युर्सन कॉलेज गेट दरम्यान उजव्या बाजूची पार्किंगला बंदी घातली होती. त्याला स्थानिक नागरिक आणि डेक्कन परिसर बचाव कृती समितीने विरोध केला होता. याबाबत पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार वाहतूक शाखेने उजव्या बाजूला काही ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी मोटारी लावण्यास परवानगी दिली आहे. मात्र, चॉकलेट इन हॉटेल पासून ते शिरोळे कॉम्पलेक्स गाळा क्रमांक तीन पर्यंत नो-पार्किंग करण्यात आले आहे. त्याच बरोबर हॉटेल वैशाली पासून काही अंतरावर नो-पार्किंग राहणार आहे.

Story img Loader