पुणे : तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीने समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने माऊलींच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त डिसेंबरमध्ये दर्शनासाठी आळंदीमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.

देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माऊलींची मूर्ती, ज्ञानेश्वरी आणि गाथा देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या सदिच्छा भेटीच्या प्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, योगी निरंजननाथ आणि उमेश महाराज बागडे उपस्थित होते.  वारकरी संप्रदायाचे महत्त्व, माऊलींची समाधी, आषाढी पायी वारी आणि देवस्थानच्या विविध प्रकल्पांची छायाचित्रांसह माहिती योगेश देसाई यांनी राष्ट्रपतींना दिली. ४० मिनिटांच्या या भेटीमध्ये राष्ट्रपतींनी वारकरी संप्रदायाचा इतिहास जाणून घेतला. वारकरी संप्रदायाच्या वतीने केलेला सत्कार म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला आहे, अशी भावना द्रौपदी मुर्मू यांनी या वेळी व्यक्त केली.

Story img Loader