शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला मालवाहू भरधाव ट्रक ने पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात होऊन २० ते २५ शिवभक्त जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुंबई- बेंगळुरू महार्गावर पहाटे पावणे चार च्या सुमारास ताथवडे येथे हा अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातात जीविहितहानी झालेली नाही. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरू महामार्गावर शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भरधाव ट्रक ने भीषण धडक दिल्याने २० ते २५ शिभक्त जखमी झाले. ही घटना पहाटे पावणे चार च्या सुमारास घडली आहे. रात्री दहा च्या सुमारास मल्हार गड येथून शिवज्योत कार्ला येथील शिळाटना येथे घेऊन निघाले होते. पहाटे पावणे चार च्या सुमारास भरधाव ट्रक ने त्यांच्या टेम्पोला पाठीमागून भीषण धडक दिली. यात शिवभक्त जखमी झाले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेम्पोमध्ये ३५ जण होते, पैकी २० ते २५ जणांना किरकोळ आणि गंभीर दुखापत झाली आहे. अशी माहिती डॉक्टर आणि शिवभक्तांनी दिली आहे. या घटने प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी क्लिनर ला ताब्यात घेतले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tempo carrying shivjyot accident on mumbai bangalore highway 20 to 25 people injured kjp 91 ysh