लोणावळा : खंडाळा घाटातील अंडा पाॅईंटजवळ अवजड ट्रकने मालवाहू टेम्पोला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण जखमी झाले असून, जखमींमध्ये शाळकरी मुलाचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून खंडाळा घाटातून मुंबईकडे भरधाव ट्रक निघाला होता. अंडा पाॅईंट येथील तीव्र उतार आणि वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकने दोन मालवाहू टेम्पोला धडक दिली. ट्रक उलटला. त्या वेळी ट्रक उलटून मालवाहू टेम्पाेवर आदळल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच राज्य रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक, खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोतील जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – विरोधकांची पाटण्यातील बैठक मोदी यांना हरविण्यासाठी होती की लग्न जमविण्यासाठी? रावसाहेब दानवे यांची टीका

खोपोली पोलीस, आयआयबीचे पथक, महामार्ग पोलिसांच्या पथकाने क्रेनच्या सहायाने टेम्पो, ट्रक बाजूला काढला. अपघातानंतर काही काळ या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tempo driver death after being hit by a truck at khandala ghat pune print news rbk 25 ssb