पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागातील आलिशान कारने दोघा तरुणांना चिरडल्याची घटना ताजी आहे. त्याच दरम्यान पुण्यातील शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांच्या सौरभ गायकवाड या मुलाने भरधाव कार चालवून कोंबड्या घेऊन जाणार्‍या टेम्पोला जोरात धडक दिल्याची घटना घडली आहे. तर या घटनेत कार चालक आणि टेम्पो चालक जखमी झाले आहे.तसेच या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड मांजरी मुंढवा येथील झेड कॉर्नरपासून मंगळवारी पहाटेच्या सुमारास एमएच १२ टीएच ०५०५ क्रमांकाची हॅरीयर कार घेऊन जात होता.त्याच वेळी समोरून येणार्‍या कोंबडयाची वाहतूक करणार्‍या टेम्पोला जोरात धडक दिली.

हेही वाचा…पुणे : अवघ्या नऊ वर्षांचा चिमुरडा जाताना चार जणांना जीवदान देऊन गेला…

तर या घटनेत कार चालक सौरभ गायकवाड,तसेच टेम्पो चालक आणि क्लिनर जखमी झाले आहे.त्या जखमींवर जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताच्या घटनेच्या प्रकरणी सौरभ गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कार चालकाने दारूचे सेवन केले होते का ? याबाबत देखील तपास करण्यात येत असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.