लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: भरधाव टेम्पोच्या धडकेने दहा महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना धनकवडी भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाच्या विरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काव्या राहुल भागवत असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. काव्याची आई प्रतीक्षा (वय २२, रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी) हिने या संदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रतीक्षा दहा महिन्यांची मुलगी काव्याला कडेवर घेऊन निघाली होती. धनकवडीतील शंकरमहाराज मंदिरापासून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरघाव टेम्पोने पादचारी प्रतीक्षाला धडक दिली. प्रतीक्षा आणि तिची दहा महिन्यांची मुलगी काव्या जखमी झाले. टेम्पोच्या चाकाखाली सापडून काव्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत असून सहकारनगर पोलिसांनी टेम्पोचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.