हिंजवडीजवळील मारूंजी येथे असलेल्या एका गोदामाला लागलेल्या आगीत सहा डस्टर आणि चार मांझा अशा दहा अलिशान मोटारी जळून खाक झाल्या. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.  मोटारीच्या अंतर्गत वायरींगमध्ये शॉर्टसर्कीट झाल्यामुळे आग लागली असण्याची शक्यता असून यामध्ये कोटय़वधीचे नुकसान झाले आहे.
पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाकडून मिळालेल्यामाहितीनुसार, हिंजवडीजवळील मारुंजी येथे रेनॉल्ड कंपनीच्या मोटारीचे गोदाम आहे. या ठिकाणी उत्पादित केलेल्या नवीन मोटारी लावल्या जातात. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गोदामातील मोटारींना आग लागल्याचा दूरध्वनी आला. त्यानुसार काही मिनिटांमध्ये अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोहोचेपर्यंत दहा मोटारी जळाल्या होत्या. गेल्यानंतर तत्काळ आग विझवण्यात आली. या आगीत डस्टर सहा आणि मांझा चार मोटारी जळाल्या आहेत. हे गोदाम मोकळ्या ठिकाणी असल्यामुळे मोटारीतील अंतर्गत वायरींगमध्ये शॉर्टसर्कीट होऊन आग लागली असण्याची शक्यता आहे.

Story img Loader