पीएमपीच्या पास केंद्रातून दहा हजार ७०० रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली.याबाबत व्यंकटी धनगरे (वय ४२ रा. लोणी काळभोर) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनगरे पीएमपी कर्मचारी आहेत. विश्रांतवाडी भागात पीएमपीचे पास केंद्र आहेत. पास केंद्र बंद करुन धनगरे प्रसाधनगृहात गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: विमाननगर भागात १० लाखांचे अमली पदार्थ जप्त; बिहारमधील तरुण अटकेत

त्या वेळी पास केंद्रातील दरवाजा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. पास केंद्रात जमा झालेली दहा हजार ७०० रुपयांची रोकड लांबवून चोरटे पसार झाले. धनगरे प्रसाधनगृहातून परतले. तेव्हा पास केंद्राचा दरवाजा उचकटल्याचे लक्षात आले. रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण तपास करत आहेत.