लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीसाठी पुण्यात सात हजार, पिंपरी-चिंचवडमध्ये साडेचार हजार, तर ग्रामीण भागात पाच हजारांपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असणार आहे.

ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
Satara District Sessions Judge detained for questioning in attempt to take bribe
लाच मिळविण्याच्या प्रयत्नात सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश चौकशीसाठी ताब्यात
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…

पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ही माहिती देण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘पुणे शहरात ३२२७ मतदान केंद्रे असून त्यापैकी ४३० मतदान केंद्रे बारामती मतदारसंघाची आहेत. सात हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत. अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक यांवर विशेष लक्ष असणार आहे. १६ संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष असणार आहे.’

आणखी वाचा- पुणे : स्पर्धा परीक्षार्थी तरुणीची १५ लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडमध्ये मावळ आणि शिरूर हे लोकसभा मतदारसंघ येतात. या दोन मतदारसंघातील पिंपरी-चिंचवडमध्ये १८५४ मतदान केंद्रे आहेत. १ डिसेंबरपासून २५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. १३ जणांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायदा, तर १८ जणांवर मोक्का लावण्यात आला असून ९९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ९५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ३१ पिस्तूले, १७५ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. १२५ फरार गुन्हेगारांना अटक केली आहे. एक कोटी ८० लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त किंवा नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येत आहे. परवानाधारकांची शस्त्रे जमा करून घेण्यात येत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने ४५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असणार आहे.’

ग्रामीण भागात सहा हजार जणांवर कारवाई

ग्रामीण भागात शिरूर, मावळ आणि बारामती हे मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघातील ग्रामीण भागात ३१०२ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी पाच मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्म कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सहा हजार गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जानेवारीपासून आतापर्यंत २२ विनापरवाना पिस्तूल जप्त करण्यात आली असून आरोपींना अटक केली आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

Story img Loader