पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील बोरघाटात भरधाव ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रकला भीषण धडक दिल्याने अपघात झाला. यात पाठीमागील ट्रक पलटी होऊन तीन जण जखमी झाले. ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. काच घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने मुंबईकडे जाणारी जड वाहतूक दोन तासांसाठी बंद करण्यात आली होती. तर हलक्या वाहनांची वाहतूक जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरून वळवण्यात आली होती. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, काच घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर काचांचा खच पडल्याचं बघायला मिळालं.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली; पवनाधरण ९२ टक्के भरले

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
accident on Palm Beach Road, navi mumbai
पाम बीच मार्गावरील अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी
Elderly Man Narrowly Escapes Death Before Vande Bharat Swooshes By shocking video
VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले

पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर बोरघाटात झालेल्या भीषण अपघातात ट्रकचं मोठं नुकसान झालं असून या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास बोरघाट पोलीस चौकी जवळ झाला आहे. अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तासांसाठी थांबविण्यात आली होती. मुंबई लेनवर काचांचा खच पडला होता.

दरम्यान, अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जखमी तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर युद्ध पातळीवर ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू होतं. दोन तासानंतर ट्रक रस्त्याचा बाजूला घेण्यात आला आहे. सुदैवाने यात मोठी जीवितहानी झालेली नाही.