सहकारनगर पोलिसांकडून १२ जणांवर गुन्हा
पद्मावतीतील तळजाई वसाहत परिसरात टोळक्याने दहशत माजविली. टोळक्याने मोटारीची तोडफोड केली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून १२ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल दळवी, साहिल कांबळे, किरण कांबळे, प्रणव कांबळे, साहिल ढावरे, नागेश ढावरे, रोहन देवकुळे, ओंकार कसबे, कृष्णा खिलारे, अमर जाधव, अण्णा कांबळे (सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मंगल मिसळे (रा. तळजाई वसाहत, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळजाई वसाहत परिसरात आरोपी शिरले. त्यांच्याकडे दांडके, कोयते होते. नागरिकांना शिवीगाळ करुन टोळक्याने दहशत माजविली. मिसळे यांनी त्यांची मोटार घराबाहेर लावली होती. टोळक्याने मोटारीची तोडफोड करुन दहशत माजवून टोळके पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण तपास करत आहेत.

Story img Loader