पिंपरी : किरकोळ वादातून टोळक्याने गहुंजेत धुडगूस घातला. कोयत्याने घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान करत आरडा-ओरड केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी सागर जालिंदर बोडके (वय २६, रा. गहुंजे, मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रज्ज्वल मळेकर, करण भिसेला ताब्यात घेतले आहे. तर, विकी शर्मा याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – राज ठाकरे पुण्यात

हेही वाचा – पुणे : वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक, मनसेच्या माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

फिर्यादी सागर आणि विकी यांच्यात मामुर्डीतील मांडव टाहाळ्यात किरकोळ वाद झाला होता. त्या वादातून विकी सोमवारी फिर्यादीच्या घरात घुसला. त्याच्या आई-वडिलांना कोयत्याचा धाक दाखविला. शिवीगाळ करत वडिलांची कॉलर पकडून तुम्हाला माज आला आहे. तुमचा मुलगा सागर बोडकेचा खून करतो, त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. हातातील कोयत्याने घराच्या समोरील खिडकीचा काच फोडली. गल्लीत आरडा-ओरडा करुन दहशतीचे वातावरण केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror of koyta gang in gahunje the windows of the house were broken pune print news ggy 03 ssb