पुणे : येरवड्यात टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी जय भडकुंभे (वय २२), ऋषभ भडकुंभे (वय २३), रोहन मोहिते (वय २१, सर्व रा. येरवडा) यांच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजीत किरण कुलकर्णी (वय २१, रा. यशवंतनगर, येरवडा) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि कुलकर्णी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. कुलकर्णी येरवड्यातील नवी खडकी भागातून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला गाठले. या भागातील आम्ही दादा आहोत, असे सांगून टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला.

हेही वाचा – वर्धा : तो ‘वाणी’ परवडला, पण ‘हा’ वाणी नक्को रे बाप्पा, ग्रामीण भागातील सूर

हेही वाचा – तलाठी परीक्षेचे सर्व्हर डाऊन; परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ आणि…

कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. आरोपी पसार झाले असून, पोलीस उपनिरीक्षक शेलार तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून भररस्त्यात कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror of koyta gang in yerawada assault on youth pune print news rbk 25 ssb