लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : येरवड्यात कोयते उगारुन अल्पवयीन मुलांनी दहशत माजविली. अल्पवयीन मुलांनी दुकानांवर दगडफेक करुन वाहनांची तोडफोड केली.

याबाबत पोलीस कर्मचारी अजित वाघुले यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुले कोयते घेऊन येरवडा भागातील रामनगर भागात आले. त्यांनी शिवीगाळ करुन कोयते उगारले. दोन दुकानांमध्ये शिरुन तोडफोड केली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या दोन मोटारी, दोन दुचाकींची तोडफोड केली. नागरिकांना धमकावून अल्पवयीन मुलांनी कोयते उगारले.

आणखी वाचा-“शालेय पोषण आहारात अंडी वाटपाचा निर्णय मागे घ्या, अन्यथा…”, भाजप अध्यात्मिक आघाडीचा इशारा

त्यानंतर टोळक्याने येरवडा भागातील सादलबाबा चौकातील मद्यविक्री दुकानासंह तीन दुकानांमध्ये शिरुन काचा फोडल्या. अल्पवयीन मुले पसार झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दहशतीमुळे नागरिकांनी तक्रार न दिल्याने पोलिसांनी याप्रकरणी स्वत:हून तक्रार दिली. गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुले सामील झाल्याने चिंतेचा विषय ठरला आहे. गुन्हेगारीच्या आकर्षणापोटी अल्पवयीन मुले गंभीर गुन्हे करत असल्याने पोलीस ठाण्यांना अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहे.