लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: वैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन दुकानांवर दगडफेक केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागिरकांना आरोपींनी बांबूने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश किंडरे (वय २६, रा. उत्तमनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी श्री गणेश वाघमारे (वय २२, रा. राहुलनगर, शिवणे, उत्तमनगर), प्रतीक संजय नलावडे (वय २४, रा. गंगा बिल्डींग, कोंढवे धावडे) यांना अटक करण्यात आली आहे. किंडरे याने या संदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश किंडरे याची आरोपी वाघमारे, नलावडे यांच्याशी भांडणे झाली होती. आरोपी वाघमारे, नलावडे आणि तीन साथीदारांनी उत्तमनगर परिसरात किंडरेला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले.

हेही वाचा… पिंपरी: हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना बांबूने मारहाण केली. शेजारी असलेल्या चिकन विक्री आणि केशकर्तनालयावर दगडफेक करुन दहशत माजविली. पसार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror of koyta gang on nda road pune print news rbk 25 dvr