पुणे : सिंहगड रस्ता भागातील धायरी फाटा परिसरात कोयता गँगने दहशत माजवून एका तरुणावर वार केल्याची घटना घडली. वर्दळीच्या भागात घडलेल्या तरुणावर झालेल्या हल्ल्यामुळे घबराट उडाली.
हेही वाचा – पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोने केला प्रवास, प्रवाशांशी साधला संवाद
हेही वाचा – राज्यात पुढील सहा दिवस पावसाची उघडीप, हवामान विभागाचा अंदाज
मनोज सूर्यवंशी असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दादा मोघे, श्रावण हिरवे, बंटी कांबळे, साहिल चिकणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोघे आणि हिरवे यांना ताब्यात घेण्यात आले. सूर्यवंशी धायरी फाट्याजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. पसार झालेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.