धर्म आणि दहशतवादाचा संबंध नाही. दहशतवाद हा एक उद्योग झाला असून तरुणांना मोठय़ा प्रमाणावर खेचून घेतले जात आहे. त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी व्यक्त केले. दहशतवादी तरुणांचा खातमा करणे हा उपाय असू शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
माधवी प्रकाशनतर्फे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या ‘आव्हान जम्मू आणि काश्मीरमधील छुप्या युद्धाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन शेकटकर यांच्या हस्ते झाले. लोकमान्य मल्टिपर्पज् को-ऑप सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, प्रकाशक नंदू कुलकर्णी, रवींद्र जोशी, चंद्रशेखर जोशी या वेळी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी आणि दहशतवादाला प्रतिबंध करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. काश्मीरला मोठय़ा प्रमाणावर दिली जाणारी मदत ही भ्रष्टाचारामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

Story img Loader