लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : धनकवडीत कोयते उगारुन टोळक्याने चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तोडफोड प्रकरणात साहिल दुधाणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुधाणे याच्याशी चव्हाण याचा वाद झाला होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले. चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

आणखी वाचा-शहरबात (अ) राजकीय : स्वान्तसुखाय’ पुण्यातील राजकीय पक्ष

आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार मोटारींच्या काचा फोडल्या, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाण याला धमकावून आरोपी मोटारीतून पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार चव्हाण तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorist vandalism of vehicles in dhankavadi case registered against gang pune print news rbk 25 mrj