पुणे: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केलेल्या कार्यरत शिक्षकांचे वेतन थांबवण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र वेतन स्थगित केलेल्या शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : पक्षविस्ताराच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा ; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा >>> पुणे: ओला दुष्काळ, पूरस्थितीत सरकारचे अस्तित्वच नाही; धनंजय मुंडे यांची टीका

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने जाहीर केली. त्यात सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचाही समावेश होता. त्यामुळे संबंधित शिक्षकांवर कारवाई म्हणून त्यांचे शालार्थ आयडी रद्द करून वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईविरोधात संबंधित शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला.

हेही वाचा >>> पुणे : गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घाला , महापालिकेचा वाहतूक विभागाला प्रस्ताव

प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी राज्यातील विभागीय उपसंचालकांना या संदर्भात पत्राद्वारे निर्देश दिले. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार वेतन स्थगित केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे निर्देश आहेत. न्यायालयाच्या आदेशाशिवाय वेतनवाढ मंजूर करता येणार नाही. याचिकेतील कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत पूर्ववत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader