पिंपरी : पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टाेळक्याने देहूरोड येथील ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा सिमेंट ब्लाॅक, कुंडी, लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री देहूराेडमध्ये घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाल विजय थोरी (वय २४, रा. विकासनगर, देहूराेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल याचे वडील विजय रामशरण थाेरी (वय ४७) यांनी देहूराेड पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते ठाकरे गटाचे देहूराेड विभागप्रमुख आहेत.

हेही वाचा >>>पुणे : मोदींचा मेट्रोला हिरवा झेंडा! पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गाचे भूमिपूजन; रुबी हॉल ते रामवाडी सेवा सुरू

या प्रकरणी राेहन राजेश देशमुख (वय २३), चिक्या ऊर्फ सुयश विलास देशमुख (वय २६, दाेघेही रा. साई काॅलनी, विकासनगर), अमित कैलास वरगडे (वय २४), वैभव शिवाप्पा ओनी (वय २०, दाेघेही रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक करण्यात आली आहे. अन्य तीन आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि आराेपी यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले हाेते. त्याचाच राग आराेपींच्या मनात हाेता. बुधवारी मध्यरात्री विशाल आणि आरोपींमध्ये पुन्हा वाद झाला. आराेपी राेहनच्या आजीने फिर्यादी थाेरी यांच्या पत्नीला फाेन करून विशालने रोहनसोबत वाद केला आहे. २० ते २५ मुलांना बोलावून विशालला मारण्याची धमकी दिली. तसेच राजेश देशमुख याने फिर्यादी थाेरी यांना तुझ्या मुलाचे खूप नाटक झाले आहे. त्याला सोडणार नाही. त्याला मारणार, वाचला तर पोलीस चौकीत जमा करतो, असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर आराेपींनी विशाल याला लाकडी दांडक्याने, सिमेंट ब्लॅक, कुंडीने जबर मारहाण करून त्याचा खून केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group dehurod area chief son killed pune print news ggy 03 amy